अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) — चाळीसगाव तालुक्यातील न्यायडोंगरी रेल्वे तांडा परिसरात आज सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. रमेश शिवाजी पवार (वय 34 वर्षे) हे आपल्या भावाच्या शेतावरून घरी परतत असताना आज दिनांक 19 जून रोजी सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी धावत्या रेल्वेखाली आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
रमेश पवार हे व्यवसायाने मजूर होते. आपल्या कुटुंबाचा चरितार्थ ते मजुरी करून चालवत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले आणि वृद्ध वडील असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते,पुढील तपास लोहमार्ग पोलिस करत आहे.
