संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-पोलीस स्थापना दिन (रेझींग डे) निमीत्त चाळीसगांव शहरातील सर्व बँक आणि फायनान्शिअल इन्स्टिट्यूट मॅनेजर्स यांची बैठक घेत सूचना देण्यात आल्या तसेच शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना पोलीस स्टेशन येथे बोलवुन पोलीस स्टेशन चे कामकाज व आवश्यक अशी इतर माहीती शहर पोलिस स्टेशन तर्फे देण्यात आली.दोन्ही उपक्रम हे उत्कृष्ट असे उपक्रम आहेत.एका उपक्रम मुळे विद्यार्थी सजग बनतील तर दुसऱ्या उपक्रमाने नक्कीच जनजागृती होत गुन्हेगारीला आळा बसेल.
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन (रेझींग डे) निमीत्त चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनकडुन पोलीस सप्ताह साजरा करण्यात येत असुन त्या अनुषंगाने चाळीसगांव शहरातील सर्व बँक आणि फायनान्शिअल इन्स्टिट्यूट यांचे शाखा मॅनेजर यांची आज दिनांक 3 जानेवारी रोजी अपर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगांव भाग राजेशसिंह चंदेल, चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी व चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार हे उपस्थितीत होते.सदर बैठकीत सर्व बँक आणि फायनान्शिअल इन्स्टिट्यूट यांचे शाखा मॅनेजर यांना खालील प्रमाणे सुचना व मार्गदर्शन करण्यात आले आहे.
1. ATM सेंटर सिक्युरिटी :- ज्या बँकांनी अद्याप रक्षक नेमले नाहीत, त्यांनी त्वरित नियुक्ती करावी.प्रत्येक बँक / ATM समोर स्वतंत्र्य पार्कीग व्यवस्था करण्यात येवुन रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.चाळीसगाव शहर पोस्टेहद्दीतील सर्व ATM मध्ये पैसे भरण्यासाठी कंत्राट दिलेल्या सर्व कंत्राट प्रमुख यांची मासीक मिटींग घेण्यात येवुन त्यांना सुरक्षीततेच्या दृष्टीने घ्यावयाची खबरदारी व करावयाच्या उपाययोजना याबाबत सुचना देण्यात याव्यात. चाळीसगाव शहर पोस्टेहद्दीतील सर्व ATM वर व्हीजीट बुक ठेवण्यात यावेत.
2. फसवणुकीचे प्रकार टाळणे :- सुरक्षा रक्षक नसल्यामुळे ATM कार्ड बदलणे, कार्ड ब्लॉक करणे यासारखे फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
3. फ्रॉड प्रकरणांवर सहकार्य बँकांमध्ये फ्रॉड प्रकरणांबाबत ग्राहकांनी तक्रार दिल्यास, त्याचा प्राथमिक अहवाल चार ओळींच्या स्वरुपात पोलीस स्टेशनला पाठवावा. ग्राहकांना cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवण्यासाठी आणि 19030 वर कॉल करण्यास मार्गदर्शन करावे.
4. CCTV दर्जा सुधारणा बँकेच्या आणि ATM सेंटरच्या आवारात उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
5. फसवणूक रोखणे :- नोटा मोजून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवावे व योग्य ती खबरदारी घ्यावी.
6. महत्त्वाचे हेल्पलाइन नंबर 1930 (सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर) आणि 112 (पोलीस हेल्पलाइन नंबर) या नंबरसह cybercrime.gov.in या वेबसाईटची माहिती बँकेच्या परिसरात जनतेला सहज दिसेल अशा ठिकाणी लावावी.
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करण्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमात पोलीस स्टेशन हद्दीतील चार शाळेतील एकूण 380 विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
1. राष्ट्रीय विद्यालय अंधशाळा,
2. हरिभाऊ चव्हाण प्राथमिक विद्यालय
3. नालंदा विद्यालय चाळीसगाव
4. भास्कराचार्य इंग्लिश मेडियम स्कूल
या शाळेतील विद्यार्थ्यांना चाळीसगाव पोलीस ठाणे येथे बोलावून पोलीस ठाण्याचे कामकाज, शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, आणि पोलीस यंत्रणेचे कार्य याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. पोलीस रेझिंग डे सप्ताहाच्या निमित्ताने अशाच प्रकारचे उपक्रम पुर्ण सप्ताहात राबविण्याचा पोलीस प्रशासनाचा मानस आहे.
