संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील मातोश्री ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथे मेंदू व मनका विकार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन शुक्रवारी (ता.17) दुपारी एक ते पाच या वेळेत करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये नावनोंदणी शुल्क नाममात्र दोनशे रुपये ठेवण्यात आले आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्ग तज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत तपासणी व शस्त्रक्रिया होणार आहे.
महात्मा ज्योतिराव फुले योजने अंतर्गत मातोश्री ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथे शिबीर आयोजित केले आहे. शिबिरात मेंदूमधील गाठी, सतत डोके दुखणे, झटके येणे, मानदुखी, अर्धांगवायू, कंबरदुखी, विसरभोळेपणा, मणक्याचे विकार, अचानक स्मृती भ्रंश, स्पॉडीलायसिस यांसह विविध आजारांची तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात होणार आहे. या शिबिरात मेंदू व मणके विकार तज्ञ डॉ सागर पाटील(MS.M.CH) ( J.J HOSPITAL MUMBAI) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.या शिबीरा मध्ये तपासणी केल्या नंतर मोफत शस्त्रक्रिया शतायु हॉस्पिटल धुळे येथे होणार असून या शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन शातायु हॉस्पिटल चे डॉ पाटील यांनी केले आहे.
तसेच शिबिरात नाव नोंदणी साठी निलेश पाटील संपर्क – 7219708759 व ईश्वर पाटील संपर्क – 9158581540 यांच्याशी संपर्क साधावा.
