अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव (प्रतिनिधी)- शहरातील मेहरूण परिसरातील मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मेहरूण तलावात बुडून मृत्यू माहिती मिळताच घटना स्थळी पोलिस प्रशासन व नगरपालिका कर्मचाऱ्यांसह कुटुंबीयांची धाव.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मेहरूण परिसरातील मोहम्मद नदीम शेख (वय अंदाजे २० वर्षे) हा तरुण आपल्या काही मित्रांसोबत पोहण्यासाठी मेहरूण तलावात गेला होता,मात्र पोहताना दम लागून त्याचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.यावेळी त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस प्रशासन,महानगरपालिका कर्मचारी तसेच नदीमचे कुटुंब दाखल झाले होते.त्याचा मृतदेह तलावातून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
या घटनेमुळे कुटुंबियांनी व परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे.
