अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी)– स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी प्रवासी रिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशाचे खिशातून रोख रक्कम चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत एका आरोपीस अटक केली आहे. त्याच्याकडून प्रवासी रिक्षासह एकूण ₹१,५३,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फिर्यादी सद्दाम हुसेन बागवान, रा. भुसावळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता जळगावहून भुसावळकडे रिक्षामध्ये जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या खिशातील ₹२५,०००/- रोख रक्कम चोरी केली. त्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दि. १९ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या पथकाने आरोपी शोयब हमीद खान (वय २५, रा. शाहुनगर, भिस्ती मोहल्ला, जळगाव) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार प्रधुम्न ऊर्फ बंटी नंदु महाले (रा. खंडेराव नगर, जळगाव) व टोनी (रा. पिंप्राळा) यांच्यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली.
आरोपी शोयब याच्याकडून त्याच्या वाट्याला आलेले ₹३,०००/- व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा मिळून ₹१.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचे साथीदार मात्र फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. तसेच या टोळीने जळगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीतही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि. शरद बागल, सफौ/अतुल वंजारी, पोहेकॉ अक्रम शेख, पोहेकों/विजय पाटील, पोहेकॉ उमाकांत पाटील, पोहेकों/प्रविण भालेराव, पोहेकॉ/मुरलीधर धनगर, पोना/किशोर पाटील, पोकों/प्रशांत परदेशी, पोकों/रविंद्र कापडणे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव तसेच सदर गुन्हयात तांत्रिक मदत पोकों/पंकज खडसे, गौरव पाटील, पोकों/ मिलींद जाधव यांनी केली आहे.
