Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

बसपा कार्यलयात तोडफोड, दोघांना मारहाण. तिघांवर अट्रोसिटी गुन्हा दाखल

0
2 0
Read Time2 Minute, 12 Second

पुणे(प्रतिनिधी):-बसपा कार्यलयात तोडफोड, दोघांना मारहाण. तिघांवर अट्रोसिटी गुन्हा दाखल. गोदाऊनच्या बाहेरील कचरा न उचलल्याच्या रागातून बहुजन समाज पक्षाच्या कार्यलयात तोडफोड करून ऐकाला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला.या गुन्ह्यात तिघांना अट्रोसिटी गुन्ह्यात अटक करण्यात आली,सूरज बाबासाहेब पोकळे,प्रसाद रमेश पोकळे,रमेश उर्फ आबा दत्तात्रय पोकळे(रा.धायरी, पुणे.)अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबत अरुण नानाभाऊ गायकवाड(44,रा,लोणारे वस्ती धायरी)यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी गायकवाड हे शनिवारी अकरा वाजता त्यांच्या सिहंगड रोड येथील बसपा कार्यालयात बसलेले असताना.सुरज,रमेश,प्रसाद हे त्यांच्या पक्ष कार्यालयाजवळ आले.गायकवाड यांनी संशयित आरोपिकडून गोडाऊन भाड्याने घेतले आहे.या गोडाऊनच्या बाहेर पडलेला कचरा का उचलला नाही,या कारणावरून चिडून जाऊन तिघांनी फिर्यादी यांचा मुलगा सूरज गायकवाड याला बांबूने व लोखंडी रॉडने मारहाण केली.तो घाबरून घराच्या दिशने पळून गेला.त्यानंतर तिघांनी फिर्यादीच्या कार्यालयातील पार्टीशीन फोडून दहा हजारांचे नुकसान केले.तसेच फिर्यादी यांना डोक्यावर हातावर मारहाण केली व जातीवाचक शिवीगाळ करून महापुरुषांबाबत अपशब्द वापरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: