Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

मका पिकावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन करणेबाबत,किटकशास्त्र विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला यांची माहिती

0
0 0
Read Time10 Minute, 8 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
जळगाव, दि. 16 (वृृत्तसेेवा) – नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात अकोला, बुलढाणा व चंद्रपूर जिल्ह्यात मका पिकावर नविन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. तरी शेतकरी बंधुनी शेताचे नियमित सर्वेक्षण करुन या किडीचा त्वरित बंदोबस्त करावा. असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
खाद्य वनस्पती – ही किड बहुभक्षीय असून 80 पेक्षा जास्त वनस्पतीवर आपली उपजिविका करते. परंतु गवतवर्गीय पिके हे या किडीचे सर्वात आवडते खाद्य आहे. हि किडी सर्वात जास्त मका, मधू मका, ज्वारी यावर उपजिविका करतांना आढळून येते, हराळी, सिंगाडा, कापूस, रान मेथी, मका, ओट, बाजरी, वटाणा, धान, ज्वारी, शुगरबीट, सुदान ग्रास, सोयाबीन, ऊस, तंबाखू व गहू यावर वारंवार प्रादुर्भाव होतो. भाजीपाल्यामध्ये फक्त मधूमक्यावर नियमित प्रादुर्भाव असतो. परंतू इतर भाजीपाला, फळ पिकामध्ये सेप, अंगूर, संत्रा, पपई पीच, स्ट्रॉबेरी व इतर फुलपिकांचे कधीकधी नुकसान करते.
जीवनचक्र व ओळख – या अळीची 30 दिवसात एक पिढी पूर्ण होत असुन अखंड खाद्य मिळाल्यास 3 ते 4 पिढ्या विविध वनस्पतीवर पूर्ण होऊ शकतात. अंडी अर्थ गोलाकार असुन पानावर एका समुहात 100 ते 200 अंडी देते. अंडी समुह केसाळ व राखाडी/भुऱ्या रंगाच्या लव किंवा मऊ केसाने झाकलेले असतात. एक मादी सरासरी 1500 तर महत्तम 2000 अंडी देऊ शकते. अंडी देण्याचा कालावधी उन्हाळ्यात फक्त 2 ते 3 दिवसाचा असतो. अळी पुर्ण वाढ झालेल्या अळीचे तोंडावर पांढुरक्या रंगाचे उल्टया वाय Y आकाराचे चिन्ह असते. तर मागील बाजूस शेवटी चौकोनात चार फुगीर गोल गडद किंवा हलक्या रंगाचे ठिपके असतात. उन्हाळयात अळी अवस्था 14 दिवसाची तर हिवाळयात किंवा थंड वातावरणात ती 30 दिवसापर्यंत असु शकते. कोष चकाकणाऱ्या तपकीरी रंगाचे कोष सामान्यत: 2 ते 8 सेमी खोल जमिनीत असतात. अळी स्वत:भोवती अंडाकृती, मातीचे कण व रेशीम धागा एकत्र करुन सैल कोष तयार करते. उन्हाळयात कोषा अवस्था 8 ते 9 दिवसाची असून अती थंड वातावरणात ती 20 ते 30 दिवसाची सुध्दा राहू शकते.
प्रौढ नरामध्ये समोरचे पंखावर राखही व तपकीरी रंगाच्या छटा असून टोकाला व मध्य भागाजवळ त्रिकोणी पांढरे ठिपके असतात. मादीमध्ये समोरचे पंख नरापेक्षा कमी चिन्हांकीत असून त्यावर राखडी व तपकरी रंगाचे ठिपके असतात. मागील दोन्ही पंख मोहक चंदेरी पांढरे असून त्यावर आखुड गडद रंगाची किनार असते. पतंग अवस्था सरासरी 10 दिवसाची असुन ती 7 ते 21 दिवसापर्यंत असु शकते प्रौढ निशवर असून मादी सामान्य: बहुतांश अंडी पहिल्या चार ते पाच दिवसाच्या कालावधीत देते. नुकसान: अळया पाने खाऊन पिकाचे नुकसान करतात. नुकत्याच अंडयातुन बाहेर आलेल्या अळया पानाचा हिरवा पापूद्रा खातात. त्यामुळे पानाला पांढरे चट्टे पडतात दुसऱ्या ते तिसऱ्या अवस्थेतील अळया पानाला छिद्रे करतात. पानाच्या कडा खातात अळया मक्याच्या पोंग्यामध्ये राहून पानाला छिद्रे करतात त्यामुळे पोंग्यातून बाहेर आलेल्या पानावर एका रेषेत एकसमान छिद्रे दिसतात. सर्वसाधारण एका झाडावर एक किंवा दोन अळया राहतात. कारण त्या जवळ आल्यास एकमेकांना खातात जूनीपाने मोठया प्रमाणात पर्णहीन होऊन पानाच्या फक्त मध्य शिरा व झाडाचे मुख्य खोड शिल्लक राहते. झाड फाटल्यासारखे दिसते पोंगा धरण्याची सुरुवातीची अवस्था प्रादुर्भावास कमी बळी पडते. मध्येम पोंगे अवस्था त्यापेक्षा जास्त तर उशीरा पोंगे अवस्था अळीला सर्वात जास्त बळी पडते. अळी काही वेळा कणसाच्या बाजुने आवरणाला छिद्रे करुन दाणे खाते दिवसा अळी पोंग्यात लपून राहते
व्यवस्थापन :- मशागतीय पध्दती- स्वच्छता मोहिम राबवावी व नत्र खताचा अवास्तव वापर टाळावा, पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत एकरी २० याप्रमाणे पक्षी थांबे उभारावे (30 दिवसापर्यत)
यांत्रीक पध्दती:- पिकाच्या सुरुवातीच्याअवस्थेत पानावरील समुहात दिलेली अंडी किंवा अळयांचा समुह असलेली प्रादूर्भाव्‍ ग्रास्तपाने (पाढरे चट्टे असलेली) अंडी / अळयांसहीत नष्ट करावी. प्रादुर्भाव्‍ दिसताच प्रादूर्भावग्रस्त पोंग्यामध्ये सुकलेली वाळू टाकावी, पतंग मोठया प्रमाणावर नष्ट करण्यासाठी कामगंध सापळयांचा एकरी पंधरा या प्रमाणे वापर करावा. सापळे पिकाच्या घेराच्या उंचीबरोबर प्राधान्याने सुरुवातीच्या पोंगे अवस्थेत लावावे,
जैविक नियंत्रण- रोपे ते सुरुवातीची पोंगे अवस्थेत 5 टक्के पोंग्यमध्ये तसेच 10 टक्के कणसामध्ये प्रादुर्भाव आढळल्यास जैविक किटकनाशकांची फवारणी करावी.
मेटारायझीयम ॲनिसोप्ली पावडर (1×10 सीएफयू/ग्रॅम) 50 ग्रॅम किंवा नोमुरीया रीले पावडर (1×10 सीएफयू/ग्रॅम) 30 ग्रॅम /10 ली पाणी या प्रमाणे उगवणे नंतर 15 ते 25 दिवसांनी पोंग्यत फवारावे त्यानंतर प्रादूर्भावानुसार 10 दिवसाच्या अंतराने 1 ते 2 फवारण्या कराव्या, बॅसीलस थूरीजीअसीस व कुर्सटाकी 20 ग्रॅम /10 ली पाणी किंवा 400 ग्रॅम / एकर या प्रमाण फवारणी करावी.
रासायनिक किटकनाशकांचा वापर:- शेतकरी बंधुनी फवारणी सायंकाळी किवा सकाळी करावी तसेच द्रावणाचे जाडसर तूषार पोंग्यमध्ये पडेल अशा प्रकारे फवारणी करावी म्हणजे अळयांचे प्रभावी नियंत्रण करता येईल,
रोपे ते सुरुवातीची पोंगे अवस्था:- अंडयाची उबवण क्षमती कमी व सुक्ष्म अळयांचा नियंत्रणासाठी 5 टक्के प्रादुर्भाव असल्यास 5 टक्के निबोळी अर्क किंवा ॲझाडिरेक्टीन 1500 पीपीएम50 मिली प्रति 10 या प्रमाणे फवारणे.
मध्यम ते उशिरा पोंग अवस्था :- अळी पोंग्यामध्ये उपजिवीका करीत असल्यामुळे रासायनिक किटकनाशकाची जास्त घनफळाच्या फवारणी (नॅपसॅक) पंपाव्दारे फवारणी केल्यास फवारणीचे द्रावण पोंग्यात जाऊन नियंत्रण मिळते, फवारणीसाठी क्लोरॅन्ट्रनिलीप्रोल 9.3 टक्के प्रवाही + ल्यॅब्डा सायहेलोथ्रिन 4.6 टक्के झेडसी प्रवाही 5 मिली किंवा सिप्नेटोराम 11.7 टक्के एससी प्रवाही 5.12 मिली किंवा क्लोरॅन्ट्रनिलीप्रोल 18.5 टक्के प्रवाही एससी, 4.32 मिली किंवा इमामेक्टीन बेंन्झोएट 5 टक्के एसजी,8 ग्रॅम किंवा इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के + ल्युफेनुरॉय 40 टक्के डब्ल्युजी.1.6 ग्रॅम किंवा थायोडिकार्ब 75 टक्के डब्ल्यु,20 ग्रॅम किंवा नोव्हाल्युरॉन 5.25 टक्के + इमामेक्टीन बेन्झोएट 0.9 टक्के प्रवाही एससी,30 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी,
गोंडा ते रेशीम अवस्था (उगवणी नंतर 8 आठवडे):- 0 या अवस्थेत रासायनिक किटकनाशकांचा वापर किफायतशीर नाही म्हणून मोठया अळया वेचाव्या. असे विभाग प्रमुख किटकशास्त्र विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: