अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील कोविड रुग्णांच्या सोयीसाठी लोकसहभागातून उभे राहिलेल्या तसेच सर्व पक्षांनी मिळून राजकारण न करता चाळीसगाव वासीयांना 100 किलोमीटरची धावपळ थांबवली राजकारण बाजूला ठेऊन जनतेच्या हितासाठी सुसज्ज असे रुग्णालय चाळीसगावकारांसाठी उपलब्ध केल्या बद्दल सर्व पक्षांचे आभार ना. गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा) यांनी व्यक्त केले चाळीसगाव येथील शासकीय दूध डेअरी च्या बाजूला रेल्वे पुला शेजारील महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य संकुल मध्ये सुसज्ज कोविड केअर सेंटर चे उद्घाटन दि दि.९ ऑगस्ट २०२० रविवार रोजी दुपारी २ वाजता ना. गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा) यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार ईश्वर जाधव, शिवसेना तालुका प्रमुख रमेश चव्हाण, उमंग महिला अध्यक्षा संपदा पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ बी पी बाविस्कर, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, तालुका आरोग्य अधिकारी देवराम लांडे, pwd नवनाथ सोनवणे यांच्या सह शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
