Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

महात्मा फुले आरोग्य संकुल ग्रामीण रुग्णालयात एच.आय.व्ही. आणि इतर शारीरिकरित्या पसरणारे आजार असलेल्या रुग्णासाठी मार्गदर्शन शिबीर संपन्न

0
0 0
Read Time3 Minute, 55 Second

संपादक गफ्फार शेख(मलिक)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगाव(प्रतिनिधी)-माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशाप्रमाणे दि.२२ सप्टेंबर २०२३ रोजी ‘ एच.आय.व्ही. आणि इतर शारीरिकरित्या पसरणारे आजार असलेल्या रुग्णासाठी मार्गदर्शन’ निमित्त तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव आणि महात्मा फुले आराेग्य संकुल ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव श्री.एन.के.वाळके यांचे अध्यक्षतेखाली शिबीर घेण्यात आले. सर्व प्रथम मान्यवरांचे हस्ते एच.आय.व्ही. आजारा संबंधीत माहितीपत्रकाचे अनावरण केले. सदर शिबीरात श्री. दिपक ठाकरे, आरोग्य सेवक यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रस्तावना केली. श्री. रमेश सुधाकर पोतदार, समांतर विधी सहाय्यक, तालुका विधी सेवा समिती, चाळीसगाव यांनी स्वरचित कविता सादर केली. श्री. नामदेव अहिरे, समुपदेशक आणि सौ. छाया सुर्यवंशी, लिंक वर्कर, साने गुरुजी फाऊंडेशन अमळनेर यांनी एच.आय.व्ही. आणि इतर शारीरिकरित्या पसरणारे आजार असलेल्या रुग्णासाठी मार्गदर्शन केले. सौ. वैद्यही पंडीत, वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ यांनी दुष्काळ / पुर / आैद्याेगिक आपत्ती इ. मुळे बाधीत झालेल्या लोकांच्या समस्या / कायदेशीर समस्या सामुहीक आपत्तीग्रस्तांसाठी मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव श्री.एन.के.वाळके यांनी आपले अध्यक्षीय भाषणात ‘सार्वजनिक सेवा आणि केंद्र / राज्य सरकारच्या योजना’ या विषयावर उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित रुग्णांशी संवाद साधून ‘एच.आय.व्ही. आणि इतर शारीरिकरित्या पसरणारे आजार’ याविषयी माहिती दिली. सदर शिबीरात सौ. पवार मॅडम, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वृंद तसेच श्री.देवेश दिपक पवार, समांतर विधी सहाय्यक तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव उपस्थित होते. तालुका विधीसेवा समिती तर्फे कार्यक्रमाचे आयोजन वैद्यकीय अधिक्षक वर्ग-१ ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव डॉ.श्री.मंदार करंबळेकर, श्री.डी.के.पवार,वरिष्ठ लिपीक व श्री. तुषार भावसार, शिपाई यांनी केले. श्री.दिपक ठाकरे, आरोग्य सेवक, ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव, ता.चाळीसगाव यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केेले व कार्यक्रमाची सांगता केली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: