Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील 2 फरार आरोपींना जळगांव गुन्हे शाखेने केले अटक

0
4 0
Read Time4 Minute, 8 Second

संपादक गफ्फार शेख(मलिक)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील माजी नगरसेवक महेंद्र ऊर्फ बाळू मोरे यांचेवर दिनांक ०७ फेब्रुवारी २०२३ रोजी फायरींग करुन त्याचा खून केल्यानंतर सदर फायरिंग करणारे आरोपी हे फायरिंग करुन पळून गेले होते त्यातील 2 आरोपींना लोणीकंद येथून ताब्यात घेण्यात जळगांव गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.

मा.पोलीस अधीक्षक, डॉ श्री महेश्वर रेड्डी जळगाव,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर चाळीसगाव, तसेच सहा. पोलीस अधीक्षक,श्री. अभयसिंह देशमुख,चाळीसगाव उपविभाग यांनी श्री. किसन नजन पाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना सदर गुन्हयांतील आरोपीतांचा शोध घेवून त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे श्री. किसन नजनपाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना दि.११ फेब्रुवारी २०२४ रोजी गोपनीय माहिती मिळाली की गुन्ह्यातील आरोपी सचिन सोमनाथ गायकवाड व अनिस ऊर्फ नव्वा शेख शरिफ शेख रा. हुडको चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव हे अहमदनगर व पुणे येथे गेले आहेत,माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी किसन पाटील यांनी पोलीस अंमलदार सफौ/ विजयसिंग धनसिंग पाटील, पोहेकॉ सुधाकर रामदास अंभोरे, पोहेकॉ लक्ष्मण अरुण पाटील, पोना राहुल जितेंद्रसिंग पाटील यांचे पथक तात्काळ अहमदनगर व पुणे येथे रवाना केले. त्याप्रमाणे वरील पथकातील पोलीस अंमलदार यांनी वरील आरोपीतांचा अहमदनगर व पुणे येथे गोपनिय माहितीच्या आधारे शोध घेत असतांना त्यांना माहिती मिळाली की, सदर आरोपी हे लोणीकंद परिसर, पुणे येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी सदर आरोपीतांचा लोणीकंद परिसरात पिंजून काढून १) सचिन सोमनाथ गायकवाड वय २३ रा. घाटरोड, चाळीसगाव ता. चाळीसगा, जि.जळगाव, २) अनिस ऊर्फ नव्वा शेख शरिफ शेख वय २३ रा. हुडको चाळीसगाव ता. चाळीसगाव जि.जळगाव यांना शिताफिने ताब्यात घेतले. सदर कारवाई करतांना पोहेकॉ अक्रम शेख याकुब, पोहेकॉ महेश महाजन, प्रमोद लाडवंजारी, पोहेकॉ शिवदास नाईक, पोना हेमंत पाटील, पोना किशोर मोरे, पोकॉ ईश्वर पंडीत पाटील यांनी सुध्दा सहकार्य केले आहे. वरील आरोपीतांना चाळीसगाव शहर पो.स्टे. CCTNS नं.५६/२०२४ भादंवि क.३०२,३०७, १२०(ब), १४३,१४४,१४७,१४८,१४९, आर्म ॲक्ट क. ३/२५ या गुन्हयांत पुढील तपास कामी ताब्यात दिले असून शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी दोन्ही आरोपींना मा न्यायालयात हजर केले असता पोलीस कस्टडी मिळाली असून पुढील तपास सुरू आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: