संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील नागद रोड परिसरात आग लागल्याने चार परिवारांचा संसार जळून राख झाल्याने परिवार रस्त्यावर आले आहे.शासकीय मदत मिळेल तेव्हा मिळेल पण आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या परीने चारही कुटुंबांना 15 दिवसांचा किराणा दिला असून त्यांचे खूप खूप आभार पण मुस्लिम समाजातून आजुन या कुटुंबांना मदत मिळाली नसल्याने कुटुंब हातश झाल्याचे दिसत आहे.
दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी शॉर्ट सर्किट झाल्याने या घरांना आग लागली होती,आग एवढी भयंकर होती की परिसरातील नागरिकांनी व नगरपालिका अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.मात्र त्या चारही घरांचा संसार, मौल्यवान साहित्य, दागदागिने वाचविण्यात अपयश आले.परिसरातील नागरीकांच्या तात्काळ मिळालेल्या मदतीने जीवित हानी झाली नाही मात्र मनाच्या इच्छा आकांक्षा मारत आयुष्यभर जोडत जोडत जमविलेल्या संसारास आगीत भस्मसात होतांना पाहून त्या कुटुंबांची आश्रु अनावर झाली होती.माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांनी घटणेस्थळी धाव घेत आपले कर्तव्य व 15 दिवसांचा किराणा देत मदत केली त्यांचे खूप खूप आभार पण मुस्लिम समाजातील त्या कुटुंबीयांना समाजाच्या मान्यवरांची आज देखील मदत मिळाली नाही.समाजात समाज अध्यक्ष पद अनेकांना हवे आहे, पण समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार हवा नको का? समाज अध्यक्ष हे पद मिरवण्यासाठी हवे आहे की,समाजाच्या हितासाठी? समाज अध्यक्ष म्हणून पुढाकार घेत समाजाची बैठक लाऊन मदतीचे आवाहन का केले गेले नाही? समाजाच्या सुखा दुखात सहभागी होत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व मुस्लिम समाजात कधी तयार होईल? अशी अनेक प्रश्न या कुटुंबाच्या घराला लागलेल्या आगीने उपस्थित करत केली असून समजातील तरुणांच्या हृदयाला या घटनेने चटका दिला आहे.याचा अनुभव देखील समाजाचे नेतृत्व असल्याचे दाखविणाऱ्या होत नसेल तर असे नेतृत्व समाज हिताचे समजावे का?
मुस्लिम समजातील स्वयंघोषित अध्यक्ष असो की प्रतिष्ठित असणारे चेहरे,आगीत संपलेला संसार उभा करणार की नाही? यावर समाजातील अध्यक्षांनी,मान्यवरांनी, समाजसेविकांनी,भावी नगरसेवकांनी विचार करत पुढाकार घेऊन मदत करण्याचे कार्य करावे म्हणजे झाले……
तरुणांचा पुढाकार
याबाबत मुस्लिम समाजातील काही तरुणांना मदतीसाठी विचारले असता ते सरळ हाताने मदत देण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले असून समाजाचे तथाकथित अध्यक्ष,समासेवक,भावी नगरसेवक पुढे येत बैठक करून त्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करणार का? की फक्त समाजाचा पाठींबा हवा आणि समाजाच्या पाठीशी उभे राहायला नको हे पण स्पष्ट व्हायला हवे….
