मुंबई(प्रतिनिधी):दि. ८ जानेवारी २०२० रोजी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले होते. या विशेष अधिवेशनाच्या वेळी धुळे शहराचे आमदार डॉ. फारूक शाह यांनी मुस्लीम समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे तसेच CAB व NRC कायदा रद्द झालाच पाहिजे अशा घोषणा देत मुंबई येथे विधानभवनाच्या पायऱ्यांवर बॅनर फडकवुन आंदोलन केले.
