महाराष्ट्र दि 29:- राजस्थानच्या कोटा येथे लॉकडाऊन मुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील सुमारे दीड हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना माघारी आणण्यासाठी धुळे आगाराच्या ७० बसेस कोटाकडे रवाना. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी केंद्र शासन व राजस्थान सरकारशी यासंदर्भात केली होती चर्चा धुळे ते कोटा हे ६३० किलोमीटरचे अंतर असल्याने प्रत्येक बसवर दोन चालकांची नियुक्ती. या चालकांना स्वसंरक्षणासाठी परिवहन महामंडळाने मास्क, सॅनिटायझर आदी आवश्यक साहित्य दिले असून सर्व बसेस केल्या आहेत सॅनिटाईझ. या निर्णयामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे .

