Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

रिक्षा चालक मालकांनी कोविड लसीकरण करून घ्यावे : अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप.

0
0 0
Read Time3 Minute, 41 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी सनी घावरी

पिंपरी-(चिंचवड)-महानगरपालिका वतीने शहरातील २५ हजार व्यक्तींना कोविड लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे , या उपक्रमात शहरातील ४५ वर्षा वरिल रिक्षा चालक मालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले आहे,
महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने चिखली येथील लसीकरण केंद्रावर रिक्षाचालकांना लस देण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी उल्हास जगताप बोलत होते,
यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे प्रभाग अध्यक्ष आणि नगरसेवक कुंदन गायकवाड, सिकृत सदस्य दिनेश यादव, सहाय्यक आयुक्त श्री खोत, प्रभाग अधिकारी मोरे साहेब, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे बाळासाहेब ढवळे, लक्ष्मण शेलार, विजय ढगारे, दीपक कुसाळकर,संजय दौंडकर, अविनाश जोगदंड, खालील मछंदार, अनिल शिरसाट, जाफर शेख, प्रदीप अय्यर ,तुषार लोंढे, दिलीप तापकीर उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ रिक्षाचालक संजय गजरे यांनी सुनिता गजरे पत्नीसोबत लसीकरण करून घेतले, तसेच रवींद्र लंके, सुरज सोनवणे यांनीसुद्धा लसीकरण करून घेतले, याबद्दल उल्हास जगताप आणि कुंदन गायकवाड यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला,
यावेळी उल्हास जगताप म्हणाले पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोणा वाढत आहे, यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी लसीकरण करणे आवश्यक आहे, यामध्ये शहरातील विविध संस्था संघटनांनी पुढे येऊन नागरिकांना शहरातील लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्याचे आव्हान करावे, यामध्ये रिक्षावाले असेन इतरही घटक असतील त्यांनी लसीकरण करून घेतल्यास आपले जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण होईल,

यावेळी बाबा कांबळे म्हणाले रिक्षाचालकांचा नागरिकांशी थेट संबंध येतो यामुळे रिक्षाचालकांना स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या सुरक्षासाठी, स्वतःचे लसीकरण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे, यामुळे शहरातील सर्व रिक्षा चालक मालकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपल्या कुटुंबासह लसीकरण करून घ्यावे असे आवाहन बाबा कांबळे यांनी यावेळी केले,
यावेळी कुंदन गायकवाड म्हणाले शहरातील हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब घटकांना मोफत लसीकरण उपलब्ध करून देण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने घेतला असून या उपक्रमांमध्ये सर्व विविध घटकांनी सहभागी होऊन लसीकरणाचा लाभ घ्यावा.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: