अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 08.00 ते 09.30 वाजेच्या दरम्यान वाघळी (ता. चाळीसगाव) येथे व्यसनमुक्ती व अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
ही रॅली शेठ कुंदनमल इंदरचंद राका विद्यालय, वाघळी यांच्या वतीने गावातील तरुण पिढी व विद्यार्थ्यांना जागरूक करण्याच्या उद्देशाने काढण्यात आली.ही रॅली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत, सहाय्यक फौजदार महेंद्र मराठे, पोलीस हवालदार प्रवीण संगिले, अकरम बेग, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल सौ. सरोदे, अश्विनी विसपुते, पोलीस पाटील सौ. बराटे मॅडम यांच्या उपस्थित पार पडली.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अजय देशमुख तसेच शिक्षकवृंद देखील उपस्थित होते.सदर रॅलीमध्ये सुमारे 200 विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
संपूर्ण गावात विद्यार्थ्यांनी हातात फलक व घोषणाबाजीद्वारे व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये व्यसनमुक्तीबाबत सकारात्मक जनजागृती झाली.
