संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील देवळी गावातील 60 वर्षीय वृद्धास जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अनोळखी आरोपींना शोधण्याचे आव्हान,मेहूनबारे पोलिसांनी आपल्या गुप्त माहिती व कौशल्याच्या आधारे केली अवघ्या 6 दिवसात अटक.
याबाबत संपूर्ण वृत्त असे की,दि. 4 जानेवारी 2025 रोजी रात्री 11 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास अशोक रघुनाथ गायकवाड, वय 60 वर्षे, रा. देवळी, ता. चाळीसगांव हे त्यांचे राहते घरामध्ये झोपलेले असताना दोन अनोळखी इसमांनी तोंडाला रूमाल बांधुन येवून घराच्या मागील दरवाजाने प्रवेश करत काही एक न बोलता त्यांच्याकडील धारदार तलवारीने व चाकूने अतिशय निर्दयपणे व क्रूरपणे त्यांच्या डोक्यावर,हातांवर, गालांवर वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये अशोक गायकवाड यांना त्यांचा डावा हात गमवावा लागला आहे.या गुन्ह्यात जखमी अशोक गायकवाड यांची सुन बेबाबाई चंदर गायकवाड, रा. देवळी. ता. चाळसीगांव यांच्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं 03/2025 भारतीय न्याय संहिता कलम 109, 332 (सी), 238, 3 (5), सह मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) 135 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयातील आरोपी हे अनोळखी असल्यामुळे तसेच सदरची घटना ही रात्रीच्या वेळी झालेली असल्याने आरोपीची ओळख पटवून अटक करणे एक पोलिसांसमोर एक आव्हान होते.
जिल्हा पोलीस अधिक्षक मा. डॉ. श्री महेश्वर रेडडी सो, अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगांव मा. श्रीमती कविता नेरकर सो, व उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगांव उपविभाग, मा. श्री राजेशसिंह चंदेल सो, यांनी सदर गुन्हयातील दोन्ही अनोळखी आरोपीतांचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शनपर सुचना दिल्या होत्या.
मा. वरिष्ठांच्या सुचनांप्रमाणे गुन्ह्याचा सखोल तपास करून गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणणेकामी प्रभारी अधिकारी प्रविण दातरे सहायक पोलीस निरीक्षक यांनी पोलीस स्टेशन अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार केले होते. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपणीय माहीतीच्या आधारे कौशल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणून आरोपी सागर राजू गायकवाड वय 24 वर्षे रा. देवळी ता. चाळीसगांव यास गुन्हयात अटक केली. नमुद आरोपीने गुन्हयाची कबुली देवून सदरचा गुन्हा हा त्याचा अल्पवयीन लहान भाऊ याचेसह केल्याचे सांगितले. त्याप्रमाणे आरोपीचा लहान भाउ यास ताब्यात घेवून तपास केला असता त्याचा गुन्हातील सहभाग निष्पन्न झाला असून तो अल्पवयीन असल्याने त्यास अभिरक्षा गृह, जळगांव येथे जमा करण्यात आले आहे. तसेच आरोपीतांनी जखमी इसमावर ज्या तलवारीने व चाकूने वार केले होते ती तलवार व चाकू गुन्हयाचे तपासात हस्तगत करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. बरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी श्री प्रविण दातरे सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उप-निरीक्षक श्री सुहास आव्हाड, श्री विकास शिरोळे तसेच पोहेकों गोकूळ सोनवणे, दिनेश पाटील, किशोर पाटील, शांताराम पवार, पोना, प्रकाश कोळी, नंदकिशोर महाजन, अशोक राठोड, पोकों विनोद बेलदार, संजय लाटे, निलेश लोहार, भुषन बाबीस्कर यांनी केली आहे.
