अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील खडकी बु येथे लोकनेते स्व.पप्पूदादा युवा फाऊंडेशन तर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवा शिवव्याख्याते आकाश दादा पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
या व्याख्यानाला खडकी बु येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत व्याख्यानाचा जाहीर कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमात प्राथमिक,माध्यमिक जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक कर्मचारी,गावाचे मा.पोलीस पाटील विनायकराव मांडोळे,ग्रुप ग्रामपंचायत खडकी बुद्रुकचे सदस्य विनोद पवार, सदस्या पुनम प्रवीण जाधव आदी मान्यवर उपस्थिती होते.
पप्पूदादा युवा फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम मांडोळे,प्रवीण जाधव,विजय पांगारे,वसंत आभाळे,गणेश कोल्हे,प्रल्हाद सावंत,गणेश पवार,पुंडलिक लोहके,योगेश चव्हाण, किशोर चव्हाण,नामदेव पालवे,दिग्विजय पाटील,विशाल मराठे,चेतन वायकर,हिम्मत मांडोळे,अमोल पवार,सर्व खडकी गावाचे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहाने संपन्न झाला.तसेच मान्यवरांच्या हस्ते युवा शिवव्याख्याते आकाश दादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
