अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी)- श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना इको क्लबच्या वतीने जलप्रदूषणावर आधारित सामाजिक मराठी चित्रपट ‘ते १० दिवस’ दाखविण्यात आला. २९ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या मंगळवारच्या शोला विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवामुळे नकळत वाढणाऱ्या जलप्रदूषणाच्या समस्येवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ मधील मन की बात कार्यक्रमातून मातीच्या मूर्तींचा वापर व नैसर्गिक गणेशोत्सव साजरा करण्याचा दिलेला संदेश हा या चित्रपटाचा आधार आहे.
धुळे- कन्नड मार्गावर दोन आयशर गाड्यांचा अपघात; एकाचा मृत्यू, एक जखमी
राघव फिल्म प्रॉडक्शन व बंधन प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन भारत वाळके यांनी केले असून पर्यावरण संवर्धन, पाणी वाचवा आणि हरित गणेशोत्सव यांसारखे महत्त्वपूर्ण संदेश यातून दिले गेले आहेत.
विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दल जागरूक करण्याच्या उद्देशाने विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी चित्रपटाची विशेष मागणी करून हा उपक्रम राबविला. या उपक्रमाला स्वाती पवार व शरद पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
