अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
संत ज्ञानेश्वर विद्यालयात स्वच्छता पंधरवडा अभियानाचा शुभारंभ
जळगाव(प्रतिनिधी) :श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात स्वच्छता पंधरवडा अभियान 2025 ची सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात आली. दिनांक 16 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. पूजनाचा कार्यक्रम परिसरातील ख्यातनाम डॉक्टर डॉ. उमेश पाटील यांच्या हस्ते पार पडला.
प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत डॉ. पाटील यांनी हात धुण्याची योग्य पद्धत तसेच स्वच्छतेचे दैनंदिन जीवनातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. “स्वच्छता ही आरोग्याचा पाया असून स्वच्छतेमुळे आपण अनेक आजारांना हरवू शकतो,” असे विचार त्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी डॉ. उमेश पाटील यांचे झाडाचे रोप देऊन आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका करिष्मा घुगे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण होऊन स्वच्छ भारत अभियानाला बळकटी मिळणार आहे.
