अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
शब्दांकन गफ्फार शेख(मलिक) संपादक
राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना पाठीवर थाप मारून बळ देणाऱ्या नेत्यांची गरज असते. जिल्ह्यात नेते गिरीश महाजन यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडविले.त्यांची पाठबळाची थाप पाठीवर घेत त्यांचा वारसा जपण्याचे काम आमदार मंगेश चव्हाण हे करत आहे. प्रचंड ध्येयवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव, आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीत त्यांनी जनमाणसांत वेगळे स्थान निर्माण केले आहे. महापूर, कोरोना यांसारख्या अनेक संकटात ते जनतेच्या मदतीला धावून आले.तालुक्याच्या विकासाच्या नवनव्या संकल्पना ते मांडत आहेत. सर्वसामान्य पक्ष कार्यकर्त्याला बळ देऊन त्याला उभे करण्याचे काम ते करतात.सामान्य कार्यकर्ता ते राज्यात कार्याचा ठसा असलेले आमदार अशी गरुडझेप घेणाऱ्या नेतृत्वाचा आज वाढदिवस यानिमित्ताने त्यांच्या राजकीय प्रवासावर नजर टाकूयात…
भ्रष्टाचाराच्या किडमुळे अनेक राजकारणी बदनाम झाले असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळते.भुल थापा देत जनतेला मुर्खात काढायचे,नुसती आश्वासन,कामाच्या नावाने वर्षानुवर्ष नागरिकांना होणारा त्रास अशी परिस्थिती पहायला मिळते मात्र याला अपवाद आहेत,आमदार मंगेश चव्हाण काम सुरू करण्याआगोदर काम पूर्ण होण्याची तारीख ठरलेली असते आणि ती भर सभेत जाहीर करणे ही पद्धत,कामाचा दर्जा,टक्केवारीचे गणित मोडून राजकारणाच्या पलीकडे समाजकारणात घेऊन जाते आणि राजकारणात राहून देखील समाजकार्य घडविले जाऊ शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे आमदार चव्हाण.राजकारणात एकमेकांचे पाय ओढण्याचे कार्य सुरू असलेले अनेकांनी पाहिले असून राजकारणात सहकाऱ्यांना ते मदत तर करतातच पण येईल त्याला निस्वार्थपणे मदत या भावनेने काम आमदार चव्हाण यांनी केले असल्याचे सहकारी व कार्यकर्ते बोलत असतात बोलण्या पेक्षा आमदार चव्हाण यांच्या जवळ असलेल्या कार्यकर्त्यांची संख्या व त्यांना तालुक्यातून मिळणारा प्रतिसाद सांगतो की त्यांचे कार्य काय आणि कसे आहे.कोणाशी जर मैत्री करायची तर मनापासून नाही तर विचार देखील करायचा नाही असा स्वभाव असलेले आमदार चव्हाण यांनी राजकारणात राहून अनेक समाजकार्य केली त्यात त्यांना त्यांच्या धर्मपत्नी यांची देखील साथ लाभली.
त्यांनी शहराच्या विकासासाठी केलेले काम सांगण्याची गरज नाही घरातून निघणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आमदार चव्हाण यांच्या विकासकामांनी घर केले आहे.लाडली बहिण योजना येण्या आगोदर अनेक बहिणींना मदत केल्याने लाडका भाऊ आमदार चव्हाण यापूर्वीच ठरले आहेत.अनेक योजनांपासून वंचित असणाऱ्या लोकांना योजना मिळवुन देण्यासाठी कार्यालयात यंत्रणा उभी केली लाभ मिळवून दिला.त्यांच्या कार्याची यादी खूप मोठी आहे आणि त्यापेक्षा आमदार चव्हाण यांचे मन मोठे आहे.
वारकरी संप्रदायाची आदर्श विचारधारा आत्मसात करून जनतेच्या लोकहितासाठी राजकीय कुरुक्षेत्रावर यशस्वी वाटचाल करणारे आमदार मंगेश रमेश चव्हाण यांना त्यांच्या कार्यामुळे उभा महाराष्ट्र ओळखतो. विकासाचे ध्येय मनाशी खुणगाठ बांधून सार्वजनिक जीवनात एक तत्त्वनिष्ठ लोकहितवादी नेतृत्व त्यांच्या रूपाने उदयास आले आहे.भाजपा पक्षाशी निष्ठा, नि:स्वार्थी स्वभाव, स्वच्छ चारित्र्य, जनहितासाठी सदैव भाजपा पक्षाच्या माध्यमातून नेहमी कार्यरत ते आहेत. सक्षम,सुरक्षित,विकसित चाळीसगाव एक स्वप्न आहे. ज्याला त्यांनी ध्येय बनविले आहे.कमी कालावधीत महाराष्ट्राच्या राजकारणात सहभाग म्हणजे आमदार चव्हाण हे भविष्यात मंत्रीपद आणणार असे नाहीतर मंत्रिमंडळात त्यांना स्थान द्यावेच लागेल यात शंका नाही आणि आमदार मंगेश दादा चव्हाण आपणास वाढदिवसाच्या विकासमय शुभेच्छा सोबत भविष्यातील मंत्रिपदासाठी देखील शुभ इच्छा…….
..
