अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-भारत गौरव सन्मान समारोह समिती दिल्ली यांच्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्कार 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त दिला जातो,त्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांनी केलेल्या आज पर्यंतच्या समाजकार्याची दखल घेऊन भारत गौरव सन्मान समारोह दिल्ली यांनी रिपाई चे जिल्हाध्यक्ष सचिन खरात यांना सामाजिक क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्रदान कोल्हापूर येथे करण्यात आला. भारतीय सेनेचे कारगिल लढाईचे योद्धा राजेंद्र पाटील साहेब, भारतीय सेनेचे कर्तव्यदक्ष अधिकारी संजय मालवेकर,सैनिक संघटने सचिव संजय मेतील व डॉ स्मिता गिरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला,कार्यक्रमाचे आयोजन भारत गौरव सन्मान समारोह दिल्ली चे कोल्हापूरचे ऑर्गनायझेशन सेक्रेटरी अनिल माळवी साहेब यांनी केले होते त्या वेळी शेकडो मान्यवर उपस्थित होते.
पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खरात आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,
वयाच्या दहाव्या वर्षी रिपब्लिकन पक्षाची बाल छावणी दौंड शहरांमध्ये कार्यरत होती.त्या बाल छावणी चा मी एक सदस्य होतो आणी आज रिपाई ए पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, सामाजिक कार्य करत असताना ज्या वेळी लोक अडचणी घेऊन येतात आणी त्या मी सोडवतो त्यावेळी अडचणीत असणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जे आंनद व समाधान असते ते आपले समाधान आहे आणी त्यांच्या आशीर्वाद आपल्याला लागत असतो, मित्रानो मी माझ्याकडे असणाऱ्या शक्तीचा उपयोग लोक कल्याणासाठी करत आहे, माझ्या वडिलांनी सांगितले की माणसे जोडने महत्वाचे आहे, मला समाज कार्यात मला माझ्या कुटुंबातून साथ मिळत आहे माझे वडील,आई,माझी बायको,माझ्या मुली,माझे मित्र परिवार, नातेवाईक यांनी खूप बळ दिले आहे.माझ्या दौंडकर परिवारचा यात मोठा सहभाग आहे व रिपाई ए चे राष्ट्रीय अध्यक्ष मा दिपकभाऊ निकाळजे यांची भक्कम साथ व आशीर्वाद आहे,या सर्वांची साथ हिच माझी खरी शक्ती आहे, पुरस्कार मिळाल्या नंतर कोल्हापूर येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यायत असतांना त्यांचा पहिला पुतळा भाई माधवराव बागल यांनी उभा केला आहे.त्या पुतळ्याचे दर्शन घेवून पुष्पहार अर्पण केले व राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रिपाई ए पश्चिम महाराष्ट्र राज्यच्या अध्यक्षा रूपाताई वायदंडे, कोल्हापूर शहराध्यक्ष बाबर साहेब, संघटक अमर तांदळे साहेब, शेरू दादा हळदेकर व कोल्हापूर येथील रिपाई ए च्या असंख्य कार्यकर्त्यांनी कोल्हापूर येथे स्वागत व सत्कार केले. त्यावेळी दौंड शहर विद्यार्थी अध्यक्ष अभय भोसले संघटक निलेश गुलीग व कोल्हापूर येथील रिपाई ए चे कार्यकर्ते उपास्थित होते.
