अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चिंचवड प्रतिनिधी सनी घावरी
चिंचवड (अधिकार आमचा)– पिंपरी-चिंचवड शहरात विविध पोलीस ठाण्यात शनिवारी दि. 13 रोजी 151 जणांवर प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याची कारवाई करण्यात आली आहे. तर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये एकावर कारवाई करण्यात आली आहे.
सध्या लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु आहे. हा टप्पा 30 जूनपर्यंत आहे. तरी ही या लॉकडाऊन च्या 5 व्या टप्प्यात अजून शिथिलता देण्यात आली आहे.
त्यामुळे नागरिक रस्त्यावर राजरोसपणे वावरत आहेत. फक्त महत्वाच्या कामासाठीच घराबाहेर पडा, असे प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार आवाहन करण्यात येत आहे.
मात्र, प्रशासनाच्या आदेशाला नागरिक झुगारून मनमानी करून कोरोना सारख्या भयंकर विष्णुला आमंत्रण देऊन स्वतःच्या. जीवणाशी खेळत असल्याचं पाहायला मिळत आहे अशाप्रकारे प्रशासनाच्या आदेशाला बेजबाबदार पणे न मानणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांचे आकडे दररोज नवीन उच्चांक गाठत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी आणखी सतर्कतेने राहणे गरजेचे आहे.
शनिवारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार भोसरी एमआयडीसी (12), भोसरी (3), पिंपरी (0), चिंचवड (18), निगडी (1), आळंदी (0), चाकण (0), दिघी (4), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (0), वाकड (47), हिंजवडी (24), देहूरोड (11), तळेगाव दाभाडे (8), तळेगाव एमआयडीसी (6), चिखली (15), रावेत चौकी (2), शिरगाव चौकी (0) अशा एकूण 151 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.