{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":2,"effects":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव शहरातील लपून-छपून चालणाऱ्या अवैध धंद्यांवर करण्यात आलेल्या प्रभावी कारवाईबाब
चाळीसगाव(प्रतिनिधी)- अवैध रित्या सुरू आलेल्या जुगार अड्ड्यावर चाळीसगाव शहर पोलिसांनी कारवाई केली असून 32 इसमांना ताब्यात घेत त्यांच्या कडून 29 हजार 775 रुपये रोख रक्कम जमा करण्यात आली आहे.
दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी शहर पोलीस निरीक्षक,चाळीसगाव शहर पोलीस ठाणे यांना गोपनीय माहिती मिळाली की, चाळीसगाव शहरातील शिवाजी घाट परिसर तसेच स्टेशन रोड परिसरात लपून-छपून अवैधरित्या जुगार खेळला जात आहे. सदर माहितीची खातरजमा केल्यानंतर,संबंधित ठिकाणी पोलीस पथकासह छापा टाकण्यात आला. या कारवाईत शिवाजी घाट व स्टेशन रोड परिसरात जुगार खेळणारे 32 इसमांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 29 हजार 775/- रुपये रोख रक्कम व जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ही यशस्वी कारवाई मा. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव; मा. कविता नेरकर (पवार), अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव; तसेच मा. राजेश चंदेल, उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगाव विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली व किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, चाळीसगाव शहर पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत पोउनि. योगेश माळी,पोहेकॉ.राहुल सोनवणे,पोहेकॉ. प्रविण जाधव, पोहेकॉ. अजय पाटील,पोहेकॉ. विनोद पाटील,पोकॉ.रविंद्र बच्छे,पोकॉ.अमोल भोसले या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
