अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख(मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई स्विफ्ट कार मधून होणारी गांजाची तस्करी रोखत 24 लाखांच्या वर किंमत असलेला 42 किलो गांजा शहर पोलिसांनी जप्त केला असून पुढील कारवाई सुरू आहे.
दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी पहाटेच्या सुमारास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी नाईट राऊंड व नाकाबंदी ड्युटीवर असताना मालेगाव रोडवरील धुळे ते छत्रपती संभाजीनगर बायपास चौफुली येथे वाहनांची तपासणी करत होते.
तपासणीदरम्यान, एक पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर (MH 12 KN 2305) गाडी थांबवून तपासणी केली असता, गाडीच्या डिक्कीमध्ये निळ्या रंगाच्या चार प्लास्टिक पिशव्यात गांजासारखा वास असलेला पदार्थ आढळून आला. सदर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले व पुढील कार्यवाहीस सुरुवात केली.
फॉरेन्सिक पथक व पंचासमक्ष झालेल्या तपासणीत सदर पदार्थ हा अंमली पदार्थ ‘गांजा’ असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळीच शेख नदीम शेख बशीर (वय 40 वर्षे, रा. गुलवानी खालदा, गल्ली नं. 3, मालेगाव, जि. नाशिक) याला ताब्यात घेण्यात आले.
सदर गांजाचे एकूण वजन 42 किलो 583 ग्रॅम असून, त्याचे अंदाजित बाजारमूल्य रु. 24 लाख 69 हजार 150/- इतके आहे. तसेच वाहतुकीसाठी वापरलेली गाडी देखील जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी NDPS कायदा कलम 8(C), 20(B), 29 अन्वये चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, पुढील तपास सुरु आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव मा. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती कविता नेरकर व पोलीस उपअधीक्षक श्री. राजेश चंदेल यांच्या सूक्ष्म मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या धडक कारवाई सहभागी पथक
पोलीस उपनिरीक्षक: संदीप घुले, योगेश माळी, कैलास पाटील, अरुण बाविस्कर
पोलीस हवालदार: राहुल सोनवणे, विनोद पाटील, योगेश बेलदार, अजय पाटील
पोलीस नाईक: भूषण पाटील, राकेश पाटील, नितीन आगवणे, महेंद्र पाटील, नरेंद्र चौधरी, अमोल भोसले, निलेश पाटील, नाना बच्चे, आशुतोष सोनवणे, विजू पाटील, राकेश महाजन, समाधान पाटील, दीपक चौधरी, पवन पाटील
महिला पोलीस शिपाई: सभा शेख
सर्वांनी टीमवर्क, दक्षता आणि धाडसाच्या जोरावर ही कामगिरी यशस्वी करून दाखवली – पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी
