Oplus_16908288
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव(प्रतिनिधी)- कन्नड घाट परिसरात ७ जानेवारीच्या रात्री भीषण कार अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात शेवगाव येथील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी झाले असून. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सर्व प्रवासी हे शेवगाव येथील असल्याची माहिती कळते.
या अपघातात जखमी झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे —
योगेश तुकाराम सोनवणे (वय २८, रा. शेवगाव),
अक्षय शिवाजी गिरे (वय २५, रा. शेवगाव),
ज्ञानेश्वर कांता मोडे (वय २४, रा. शेवगाव),
तुषार रमेश घुगे (वय २६, रा. शेवगाव).
तर या दुर्दैवी कार अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये —
तुकाराम रामभाऊ अंभोरे (वय २७, रा. शेवगाव),
शेखर रमेश दुरपते (वय ३१, रा. शेवगाव),
घनशाम रामहरी पिसोटे (वय ३०, रा. शेवगाव) यांचा समावेश आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सदर कार अपघात कन्नड घाटात झाल्याचे कळते. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. सध्या या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंद करण्यात आलेला नसून, लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या भीषण अपघातामुळे शेवगाव परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
