{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) –शहरातील हिंदू–मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या पीर मुसा कादरी बाबा दर्ग्यावर उरूसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक ५ जानेवारी रोजी पारंपरिक तलवार मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या उरूसासाठी देशाच्या विविध भागांतून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती.
भाविकांची मोठी गर्दी असूनही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चाळीसगाव शहर पोलिस प्रशासनाने अत्यंत शिस्तबद्ध व काटेकोर नियोजन केले होते. मिरवणूक मार्गावर बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी सज्ज होते.
या उत्कृष्ट नियोजनाबद्दल नवनिर्वाचित नगरसेवक शेख वसीम(चेअरमन) यांनी शहर पोलिस ठाण्यात भेट देऊन उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड तसेच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी शेख वसीम यांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानत, “धार्मिक सौहार्द टिकवून ठेवत उरूस शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे,” असे गौरवोद्गार काढले.
