अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव(प्रतिनिधी):चाळीसगाव नगरपालिकेत नुकतेच निवडून आलेले सौ. सायली रोशन जाधव, संभाआप्पा जाधव, सौ. वैशाली मोरे व सौ. पूनम अहिरे तसेच स्वीकृत नगरसेवक पदी निवड झालेले नगरसेवक रामचंद्र जाधव यांचा दीनबंधू आंबेडकर आश्रम व चाळीसगाव तालुका बौद्ध पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संचालक बौद्धाचार्य रविंद्र निकम यांनी त्रिसरण व पंचशील देऊन केली. त्यानंतर संस्थेचे सचिव नानासाहेब (धर्मभूषण) बागुल यांनी उपस्थित नगरसेवकांचा परिचय करून देत प्रास्ताविक मांडले.यानंतर सामाजिक कार्यकर्ता व संचालक गौतम जाधव यांच्या हस्ते सायली जाधव व रोशन जाधव यांचा सत्कार करण्यात आला. संचालक गौतमभाऊ झाल्टे यांच्या हस्ते रामचंद्र जाधव यांचा, संचालक ॲड. राहुल जाधव यांच्या हस्ते संभाआप्पा जाधव यांचा, संचालक रविंद्र निकम यांच्या हस्ते पूनम अहिरे यांचा, तर संचालक महेश चव्हाण यांच्या हस्ते वैशाली मोरे व संकेत मोरे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना नानासाहेब धर्मभूषण बागुल यांनी नव निर्वाचित नगरसेवकांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजाच्या प्रश्नांवर एकत्र येऊन काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. संभाआप्पा जाधव यांनी मनोगतात समाजाने केलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तर रामचंद्र जाधव यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग समाजहितासाठी करण्याची ग्वाही दिली.
अध्यक्षीय भाषणात माजी आमदार व संस्थेचे अध्यक्ष साहेबराव घोडे यांनी नगरसेवकांनी गुणवंत व ज्ञानवंत बनून नगरपालिकेतील प्रत्येक कामाची सखोल माहिती घेऊन जबाबदारीने काम करावे, असे मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप ॲड. राहुल जाधव यांनी आभार मानून केला.या कार्यक्रमास माजी आमदार व अध्यक्ष साहेबराव घोडे, सचिव धर्मभूषण बागुल, उपाध्यक्ष गौतम झाल्टे, संचालक रामचंद्र जाधव, गौतम जाधव, महेश चव्हाण, ॲड. राहुल जाधव, रविंद्र निकम, रोशन जाधव, अवधेश बागुल, विजय निकम, संकेत मोरे, धम्मपाल अहिरे, घनश्याम बागुल, विशाल, वीरेंद्र जाधव, प्रदीप मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
