अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-कर्तव्य बजावत असतानाही समाजाप्रती आपली नैतिक जबाबदारी जपणारे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल दत्तात्रेय साबळे यांनी प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. रस्त्यावर सापडलेला सुमारे २० हजार रुपये किमतीचा मोबाईल त्यांनी संबंधित मालकाला सुखरूप परत केला.
माहितीनुसार, कॉन्स्टेबल साबळे हे दुचाकीवरून घरफोडी चोरीच्या तपासासाठी जात असताना देवरे हॉस्पिटलजवळ त्यांच्या निदर्शनास रस्त्यावर पडलेला मोबाईल आला. त्यांनी तो मोबाईल उचलून सुरक्षित ठेवला आणि ज्यांचा असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चय केला.
काही वेळातच त्या मोबाईलवर बी. के. बागुल यांच्या मुलाचा फोन आला. साबळे यांनी त्यांना मोबाईल सापडल्याची माहिती देत तपासाचे काम पूर्ण करून परत आल्यावर मोबाईल सुपूर्द करू असे सांगितले. खेड्यावरून परतल्यानंतर त्यांनी स्वतः संपर्क साधून मोबाईल मालकाच्या ताब्यात दिला.
कॉन्स्टेबल दत्तात्रेय साबळे यांच्या या प्रामाणिक कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून,अश्या प्रामाणिक कार्यांमुळे पोलिस दलाविषयीचा जनतेचा विश्वास अधिक दृढ होत असतो.
