अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
मुंबई : भारतीय जनता पक्षच्या प्रदेश संघटनेत दिनांक २३ फेब्रुवारी रोजी प्रदेश वरील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात ही घोषणा करण्यात आली. यामध्ये चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांची प्रदेश चिटणीसपदी (उत्तर महाराष्ट्र) निवड करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल आमदार चव्हाण यांनी आनंद व अभिमान व्यक्त करत पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण ताकदीने पार पाडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
तसेच निवडणूक आयोगाच्या “मतदार याद्या शुद्धीकरण” (SIR) अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या भाजपच्या विशेष समितीतही आमदार चव्हाण यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. राज्यभरातील मतदार यादी अधिक पारदर्शक, अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी ही समिती कार्यरत राहणार आहे.
नव्याने निवड झालेल्या सर्व प्रदेश पदाधिकाऱ्यांचे तसेच SIR समितीतील सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे विशेष आभार मानले.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
