Oplus_16908288
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-: जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथे घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
निलेश पाटील असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी कोदगाव येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांसह गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारीही ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे पोलीस दलात तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
