Oplus_16908288
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील हिरापूर रोडवरील दूध सागर रोड परिसरात पेट्रोल-डिझेल टँकरने धडक दिल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दि.१६ एप्रिल रोजी रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात मंगलाबाई राजेंद्र देवकर या गंभीर जखमी झाल्या होत्या.
घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती.यावेळी तेथून जाणारे नगराध्यक्षा प्रतिभा चव्हाण, नगरपालिका गटनेते प्रशांत कुमावत, नगरसेवक रामचंद्र जाधव, करण पाटील, विशाल कारडा, धर्मा बच्छे, प्रदीप चावला आदींनी तत्परता दाखवत जखमी महिलेला उचलून तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या अपघातातील टँकरचा क्रमांक MH 41 BQ 9005 असा असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हिरापूर रोडवरील रस्त्याची अत्यंत खराब अवस्था असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळेच अपघाताला कारणीभूत परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
रस्त्याच्या दुरुस्तीबाबत वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे. अखेर या दुर्लक्षामुळे एका महिलेचा जीव गमवावा लागल्याने परिसरात तीव्र नाराजी पसरली असून संबंधित रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी जोर धरत आहे.
