Oplus_16908288
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी केल्याची घटना मंगळवार, दि. 21 एप्रिल 2026 रोजी दुपारी घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रतिभा सुधाकर पाटील (वय 39) या सकाळी 10 वाजेच्या सुमारास काकळणे येथून चाळीसगाव येथे बाजारासाठी आल्या होत्या. बाजार आटोपून त्या दुपारी सुमारे 12.30 वाजता चाळीसगाव बसस्थानकावर परतल्या. त्यानंतर दुपारी 1.15 वाजता पारोळा जाणाऱ्या बसमध्ये चढण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने त्या गडबडीत बसमध्ये चढल्या व आसनावर बसल्या.
बस पातोंडा गावाजवळ पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात आले की, गळ्यातील सोन्याची मणी मंगळसूत्राची पोत गायब झाली आहे. त्यांनी बसमध्ये शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही. यानंतर त्यांनी बोरखेडा येथे बसमधून उतरून नातेवाईकांना घटनेची माहिती दिली.
प्राथमिक अंदाजानुसार, बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने सुमारे 6 ग्रॅम वजनाची, अंदाजे 40 हजार रुपये किमतीची सोन्याची मणी मंगळसूत्राची पोत चोरून नेल्याची खात्री व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी संबंधित महिलेने अज्ञात चोरट्याविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास पोकॉ प्रवीण पाटील करीत आहेत.
