अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-बहुजन विद्युत अभियंता अधिकारी व कर्मचारी फोरमचे केंद्रीय अध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राज्य अध्यक्ष मा. धर्मभूषण बागुल यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने दिनांक २ मे रोजी चाळीसगाव येथे भव्य वीज कर्मचारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. राजेंद्र पवार (संचालक, महावितरण, मुंबई) यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार मा. मंगेशदादा चव्हाण, जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता मा. इब्राहिम मुलानी उपस्थित होते. तसेच समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अशोक खनाडे, माजी आमदार मा. साहेबरावजी घोडे, ओबीसी नेते मा. किसनराव जोर्वेकर, डॉ. विनोद कोतकर, अधीक्षक अभियंते मा. सायस दराडे व मा. विनोद पाटील, डॉ. सुनील भालेराव, मा. भोजराज पुंशी, मा. अजितकुमार माने, मा. भारत मुंडे, मा. मिलिंद जाधव, मा. किरण दोंदे, मा. नितीन घुमरे, मा. राज चव्हाण, आरपीआय नेते मा. सुनील सोनवणे, नगरसेवक नानासाहेब बिऱ्हाडे, पत्रकार, मिलिंद बैसाणे आदींसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन फोरमचे मुख्य संघटक मा. भगवान नाईक होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. विजय सोनवणे व मा. बापुराव पवार गुरुजी यांनी उत्कृष्टरीत्या केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत धर्मभूषण बागुल यांच्या दीर्घ सेवाकाळातील कार्याचा गौरव केला व त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या मेळाव्यास बहुजन फोरमचे शेकडो सदस्य, बागुल यांचा मित्रपरिवार, आप्तेष्ट तसेच चाळीसगाव तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जळगाव झोन अध्यक्ष कारभारी केदार, कार्याध्यक्ष स्वप्नील सूर्यवंशी, सचिव चरणदास पांढरे, संघटक भुषण खालकर यांच्यासह दत्तात्रय पगार, महेश अडकमोल, दिनेश ठाकूर, विजय चव्हाण, योगेश गांगुर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच चाळीसगाव बहुजन फोरमचे अध्यक्ष रविंद्र पाटील, सचिव गणेश अहिरे, उपाध्यक्ष दिनेश पाटील, ललित बोरसे, सहसचिव प्रदीप परदेशी, राहुल ब्राम्हणकर, कोषाध्यक्ष राकेश मोरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी योगदान दिले. समता सैनिक दलाचे महेंद्र जाधव, विशाल पगारे, नाना घोडेस्वार, ज्ञानेश्वर बागुल, कृष्णा जाधव, उमेश जाधव, घनश्याम बागुल यांनीही मोलाचे सहकार्य केले.
हा मेळावा केवळ सेवानिवृत्ती सोहळा न राहता धर्मभूषण बागुल यांच्या कार्याचा गौरव करणारा ठरला.
