अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
अधिकार आमचा विशेष
महाराष्ट्राच्या राजकारणात काही नेते हे केवळ आपल्या पदामुळे मोठे होत नाहीत, तर त्यांनी घडवलेल्या कार्यकर्त्यांमुळे त्यांची ओळख अधिक भक्कम होत असते. राज्याचे मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन हे असेच एक नेतृत्व आहे, ज्यांनी केवळ राजकारण केले नाही तर हजारो कार्यकर्त्यांना दिशा देत त्यांना सक्षम नेतृत्व म्हणून उभे केले. म्हणूनच आज अनेक जण गिरीश भाऊ महाजन यांना “कार्यकर्ते तयार करण्याची फॅक्टरी” म्हणून संबोधतात.
जामनेर तालुक्यापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास आज राज्याच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्वापर्यंत पोहोचला आहे. पण एवढ्या मोठ्या प्रवासात त्यांनी कार्यकर्त्यांची साथ कधीच सोडली नाही. सामान्य कार्यकर्त्यांशी असलेली त्यांची जवळीक, त्यांच्या अडचणी समजून घेण्याची पद्धत आणि योग्य वेळी पाठीवर टाकलेली कौतुकाची थाप यामुळे अनेक युवक राजकारणात सक्रिय झाले.
गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली तयार झालेले अनेक कार्यकर्ते आज विविध पदांवर काम करत आहेत. काही जण जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका ते विधानसभेपर्यंत पोहोचले आहेत. त्यांचे नेतृत्व हे केवळ आदेश देणारे नाही, तर कार्यकर्त्याला घडवणारे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाते.
त्याचेच एक जिवंत उदाहरण म्हणजे त्यांच्या नजरेने चाळीसगावच्या राजकारणात दिलेला “कोहिनूर हिरा” आमदार मंगेश दादा चव्हाण हे आहे. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकारणात सक्रिय झालेले मंगेश दादा चव्हाण यांचे गुण ओळखत गिरीश भाऊ महाजन यांनी वेळोवेळी योग्य संधी दिली,मार्गदर्शन केले आणि जनतेमध्ये काम करण्याच्या त्याच्या प्रयत्नांना प्रेरणा दिली. त्यातूनच आज मंगेश दादा चव्हाण हे सक्षम आमदार म्हणून आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. हे उदाहरण गिरीश भाऊंच्या नेतृत्वशैलीची साक्ष देणारे आहे.
गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिले तर लक्षात येते की त्यांनी केवळ सत्ता आणि पदाचा विचार न करता संघटन मजबूत करण्यावर भर दिला. युवकांना संधी देणे, नवीन चेहऱ्यांना पुढे आणणे आणि कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देणे ही त्यांची खास शैली आहे.
आजच्या राजकारणात अनेक नेते स्वतःपुरते मर्यादित राहतात; मात्र गिरीश भाऊ महाजन यांनी स्वतःसोबत अनेकांना मोठे केले. म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेली कार्यकर्त्यांची फळी आज महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावीपणे काम करताना दिसत आहे.
वाढदिवसानिमित्त मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली आणखी अनेक कार्यकर्ते घडोत, हीच शुभेच्छा.
