अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळावी आणि त्यांच्यामध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशाने ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने चाळीसगाव तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पाटखडकी येथे दि २९ जून रोजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, लेखन साहित्य तसेच आकलन क्षमता वाढविणारे वाचन साहित्य वितरित करण्यात आले. दर्जेदार शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला प्रोत्साहन मिळणार असून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होणार आहे.
यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक राठोड, उपाध्यक्ष आरती महाले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटखडकीचे मुख्याध्यापक बापू सोनवणे, शिक्षक अतुल गढरी, बापू चौधरी तसेच शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या वतीने तसेच विद्यार्थ्यांनी फाउंडेशनचे आभार व्यक्त करत अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
