अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) : माजी खासदार तथा आमदार उन्मेष पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालय,चाळीसगाव येथे युवासेना चाळीसगाव विधानसभा संघटन आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.या बैठकीस महाराष्ट्र राज्य विभागीय सचिव अविष्कारजी भुसे तसेच युवासेना जळगाव संपर्क प्रमुख निखिलजी चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन बळकटीकरण, आगामी कार्यक्रमांचे नियोजन आणि पक्षविस्तार यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी उपस्थित युवासैनिकांशी संवाद साधत संघटनेच्या कार्यपद्धती, युवकांचा सहभाग वाढविणे आणि आगामी काळातील विविध उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीत युवासेनेचे पदाधिकारी, शाखाप्रमुख तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते.युवासेनेचे विचार घराघरात पोहोचवून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने आणि समर्पित भावनेने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
