चाळीसगाव शहरात तोंड पाहून कारवाई?,जनतेत नाराजीचे सूर
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरात पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने धडाकेबाज कारवाई सुरू केली असून शहरात शासन नियमांचे पालन न करणाऱ्या व अत्यावश्यक सेवांमध्ये समाविष्ट नसणाऱ्या दुकानांवर कारवाईंचे सत्र सुरू आहे
या कारवाईंचे अभिनंदन मात्र कारवाई तोंड पाहून होत असल्याची चर्चा गावात रंगली आहे काही दुकांनावर कारवाई करत दंडात्मक कारवाई करत सील करण्यात आले आहेत मात्र शहरातील मुख्य स्टेशन रोड येथील रस्त्यावरील काही कापड दुकाने,चप्पल बूट दुकाने अत्यावश्यक सेवेत समाविष्ट नाहीत व यातील काही दुकांनावर दंडात्मक कारवाई सुद्धा झाली असून ही दुकाने सर्रास पणे आर्धे शटर खोलून सुरू असून यांना प्रशासनाची भीती नाही? की प्रशासन दुर्लक्ष करीत आहे? असे अनेक प्रश्न सामान्यांना पडत आहेत शासन आदेश सर्वांना सारखे असून शहरात मात्र वेगवेगळे नियम असल्याचे चित्र दिसत आहे,नगर पालिका अधिकारी या दुकानांवर कारवाई करणार का? असा सवाल देखील उपस्थित रहातो मात्र जनतेत नाराजी चे सूर निघत आहे.