संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील देवळी येथील नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत साने गुरुजी यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. तुषार खैरनार व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.जितेंद्र सूर्यवंशी यांनी दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन केले.
साने गुरुजी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांतर्फे गीत, नाटक व वक्तृत्व सादर करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन पाटील यांनी मांडले तर साने गुरुजी यांचे चरित्र श्री.राजू पाटील यांनी मांडले.
कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पाटील यांनी तर आभार श्री.प्रशांत पाटील यांनी मानले.
