संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
नाशीक(वृत्तसेवा)- जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळ असलेल्या महाराष्ट्रातील अवघड श्रेणीतील किल्ले हरिहर येथे सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक विभाग यांच्या माध्यमातून गेल्या १ वर्षापासून दुर्गसंवर्धन कार्य सुरू आहे.
गडावरील उत्तर बाजूस असलेला गुप्त दरवाजा व पायरी मार्ग यावेळी मोकळा करण्यात येत आहे.
आतापर्यंत एकूण १५ मोहीम गडावर झालेल्या आहेत. लवकरच हे काम सह्याद्रीच्या दुर्ग सेवकांच्या माध्यमातुन पूर्ण होणारं असून सह्याद्री प्रतिष्ठानने सर्व शिवभक्त व दुर्गप्रेमी यांना या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
काळाच्या ओघात दगड माती याने बुजलगेलेला हा पुरातन मार्ग येणाऱ्या पिढ्यांना पाहायला मिळावा तसेच पूर्वजांनी तयार करून ठेवलेली ही भव्यदिव्य वास्तू पुन्हा लोकांसमोर यावी या प्रामाणिक उद्देशाने सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्ग सेवक गेले वर्षभर या ठिकाणी दर शनिवार-रविवार सतत मोहिमा घेऊन श्रमदानातून काळाच्या पडद्याआड गेलेली ही वास्तू म्हणजेच पुरातन पायरी मार्ग मोकळा करण्याचे काम करीत आहेत,यासाठी अनेक शिवभक्तांनी यात सहभागी होण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे
