संपादक गफ्फार शेख
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- काही दिवसांपूर्वी सत्यकाम न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्हॉईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय संघटनेचे जळगांव जिल्हा अध्यक्ष कल्पेश महाले यांनी पत्रकारांना आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते हेल्मेट व पाल्यांना शालेय बॅगेंचे वाटप केले होते. यावेळी आमदार चव्हाण यांनी हेल्मेटचे महत्त्व सांगून, वाढत्या अपघातांच्या प्रमाणात हेल्मेटचा वापर करण्याची किती गरज आहे हे समजावून सांगत प्रत्येकाने हेल्मेट वापर करण्याचा सल्ला दिला होता.

आजच्या काळात रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत हेल्मेटचा वापर केल्यास आपल्या सुरक्षिततेची हमी घेता येते. त्यामुळे, हेल्मेटच्या महत्त्वाबद्दल जनजागृती करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने हेल्मेट वापरण्याची सवय लावून, स्वतःची आणि इतरांची सुरक्षा सुनिश्चित करावी.
मोटारसायकल चालकांनी वापर केल्यास कायद्याचे तर पालन होतेच पण चालकाची सुरक्षा देखील होत असते,हेल्मेट च्या वापरामुळे अपघातात होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी की होण्यास मदत होईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील महामार्ग पोलीस शाखा चाळीसगाव सांगितले आहे.
हेल्मेट हे केवळ एक सुरक्षा उपकरण नाही, तर आपल्या जबाबदारीचे प्रतीक आहे. त्यामुळे, प्रत्येक पत्रकाराने कल्पेश महाले यांनी हेल्मेट वाटप करून उचललेल्या छोट्या पण महत्त्वाच्या पावलाचा विचार करावा आणि रस्त्यावरील सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करून योगदान देत हेल्मेट विषयी जनजागृती देखील करावी.
