अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- कै सुधाकररावजी नाईक प्राथमिक आश्रम शाळा व कै काकासाहेब जुलालभाऊ राठोड माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा वलठाण येथे राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक श्री रविंद्र शिनकर सर होते .जयंतीप्रसंगी विद्यार्थ्यांना मान्यवरांनी राष्ट्रसंत सेवालाल महाराजांच्या कार्याची महिती दिली,रविंद्र शिनकर यांनी सेवालाल महाराजांचे जीवनातील काही आठवणी जाग्या केल्या व सुमारे सातशे वर्षांपूर्वी त्यांनी केलेला त्याग व दिलेली शिकवण आजही तंतोत कशी लागू होते ते समजावून सांगितले.
मुख्याध्यापक प्रशांत सोनजे सरांनी राष्ट्रसंत सेवालाल महाराजांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री वाघ सर ,निकम सर, पवार सर,एरंडे सर,रविंद्र पाटील सर,पावरा सर,राज पाटील सर,मोगल सर यांनी परिश्रम घेतले
