संपादक गफ्फार शेख
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालयात डॉ उज्वल कुमार चव्हाण EX IRS यांच्या हस्ते बहुउद्देशीय कॉम्प्युटर लॅबचं उद्घाटन..मिशन 500 पाच पाटील टीम दरवर्षी आगळ्यावेगळ्या पध्दतीने शिवजयंती च्या निमित्ताने शिवजन्मोत्सव सोहळा नाविन्यपूर्वक कार्यक्रमाचे आयोजन करून साजरी करत असते. विधायक मार्गाने शिवजयंती साजरी व्हावी , शिवजयंती हा एक उत्सव व्हावा यासाठी *”मिशन 500″ पाच पाटील टीम* प्रयत्न करत असते. शिवरायांच्या समाजोपयोगी कार्याच्या आठवणी, प्रेरणा आणि त्यांचा विचार पुढे नेणे हा आमचा प्रयत्न असतो.
या वर्षीच्या शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्याच्या निमित्ताने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय चाळीसगाव या शाळेत कॉम्प्युटर लॅब उद्घाटन सोहळा शनिवारी दि 15 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. मिशन 500 पाच पाटील टीम व डॉ बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात मिशन 500 चे संकल्पक मा डॉ उज्ज्वल कुमार चव्हाण Ex IRS यांनी बहुउद्देशीय कॉम्प्युटर लॅब चे उद्घाटन करताना सांगितले की ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना संगणक, कॉम्प्युटर हार्डवेअर, मोबाईल दुरुस्ती, स्पोकन इंग्लिश, सायबर सेक्युरिटी तसेच नवनवीन apps बद्दल माहिती व्हावी व या माहितीचा भविष्यात त्यांच्या जीवनात फायदा व्हावा व विद्यार्थ्यांना स्वतः च्या पोटापाण्याची सोय व्हावी. या दृष्टीने PAI-ICT संस्था पुणे व मिशन 500 पाच पाटील टिम प्रयत्नशील राहील असं सांगितलं. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे चेअरमन मा श्री गौतम भाऊ झाल्टे हे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रम ला उपस्थिती सौं सुमन ताई धनजी झाल्टे प्राथमिक विद्यालय चे मुख्याध्यापक श्री संदीप पाटील व मिशनचे पाच पाटील प्रा किरण पाटील सर, श्री प्रविण पवार सर, श्री मिलिंद देवकर सर , सौ आरस्ता माळतकर सर्व पाच पाटील, सुवर्णा बाविस्कर मॅडम, बाल आनापान समन्वयक , हे होते. तर हा कार्यक्रम यशस्वीरित्या घडून आणण्यासाठी विद्यालय चे मुख्याध्यापक श्री ए बी पाटील सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत खूप घेतली. कार्यक्रमाचे आभार श्री व्ही एस पाटील सर यांनी मानले.
