अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी) – तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र रांजणगाव अंतर्गत उपकेंद्र लोंजे येथे कार्यरत असणाऱ्या आरोग्य सेविका सौ.वैशाली रमेश जाधव यांचा भारत सरकार जिल्हा विकास समन्वयक समिती जिल्हा जळगांव केंद्र पुरस्कृत योजनामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे जिल्हा परिषद जळगाव येथे पाणी पुरवठा मंत्री ना. मा.गुलाबराव पाटील,केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे,खासदार स्मिता ताई वाघ,आमदार सुरेश मामा भोळे,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.मीनल करणवाल,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर यांच्या हस्ते दिशा जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या यशाबद्दल त्यांचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत पाटील,रांजणगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.नेहा देवरे,विस्तार अधिकारी प्रदीप सोनवणे,कुष्ठरोग तंत्रज्ञ हमीद पठाण,आरोग्य सहायक ममराज राठोड या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले आहे.
