अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी)- क्षत्रिय कुलावंत शूरवीर महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने प्रतिमापूजन करत उत्साहात साजरी करण्यात आली.
क्षत्रिय कुलावंत शूरवीर महाराणा प्रताप यांच्या 485 व्या जयंतीनिमित्ताने 9 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता चाळीसगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने प्रतिमा पूजननाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिता शिंदे यांच्या हस्ते क्षत्रिय कुलावंत शूरवीर महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील प्रतिमेचे पूजन केले.सर्वांनी शूरवीर महाराणा प्रतापसिंह यांचा जय जयकार केला. यावेळी चाळीसगाव शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील यांनी शूरवीर महाराणा प्रताप सिंह यांच्या जीवनावर आपल्या मनोगतात प्रकाशझोत टाकला.यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे ,जळगाव महिला जिल्हाध्यक्ष अनिता शिंदे, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले, शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील, शहर उपाध्यक्ष कैलास पाटील तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील, तालुका संघटक शेखर पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन गुंजाळ ,साहिल कोल्हे आदी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.
