अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव पोलीस दलातील महत्त्वाचे पद मानल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा (LCB) प्रभारीपदी एमआयडीसी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचा कार्यभार सांभाळत असताना संदीप पाटील यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची पावती म्हणून त्यांची स्थानिक गुन्हे शाखेत वर्णी लागली आहे. आपल्या कार्यशैलीने अनेक गुन्ह्यांचा तपास लावत पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले होते. ते एक कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी असून, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटीबद्ध असतात.
गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरलेले अधिकारी पोलिस निरीक्षक पाटील आता स्थानिक गुन्हे शाखेत आल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारांची चिंता निश्चितच वाढणार आहे.
