अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी): उन्हाच्या तीव्र उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या चाळीसगावकरांना दिनांक 7 जून संध्याकाळी 5 वाजे पासून सुरू झालेल्या पावसाने मोठा दिलासा दिला आहे.
सकाळपासूनच्या कडक उन्हामुळे नागरिक हैराण होते, तर अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा पसरला आणि लोकांना तात्पुरता का होईना गारवा मिळाला आहे.
सततच्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले होते मात्र संध्याकाळी धो धो पडलेल्या पावसाने हवामानातील तापमान लक्षणीय घटले आहे.
या पावसामुळे मान्सून चे आगमन वेळेवर झाले असल्याचे दिसत आहे, त्यामुळे उन्हाच्या तापमानापासून थोडीफार सुटका मिळेल,अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
