अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
शहर पोलिसांच्या दोन रात्रीत दोन मोठ्या कारवाया
चाळीसगाव (प्रतिनिधी) –दिनांक १७ जुलै २०२५ रोजी रात्री १ ते ३ या दरम्यान नियंत्रण कक्ष, जळगाव यांच्याकडून आलेल्या आदेशानुसार चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज चौक (सिग्नल पॉईंट) येथे नाकाबंदी लावण्यात आली होती. या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई करत १४ लाख ५७ हजार ४१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चौघांना अटक केली आहे.
हे ही वाचा
रात्री २.५० वाजेच्या सुमारास भडगावकडून नांदगावकडे जाणारी फोर्स कंपनीची पांढऱ्या रंगाची टॅक्स क्रुझर (क्र. MH-18 BX-8943) वाहन संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी थांबवून तपासणी केली असता वाहनातील सिटाखाली प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लपवलेला एकूण ३२ किलो १७७ ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ गांजा आढळून आला, ज्याची बाजारभावाने अंदाजे किंमत २ लाख ५७ हजार ४१६/- रुपये इतकी आहे.तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली फोर्स कंपनीची पांढऱ्या रंगाची टॅक्स क्रुझर अंदाजे किंमत १२ लाख रुपये असा एकूण १४ लाख ५७ हजार ४१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही बेकायदेशीर वाहतूक करत असलेल्या आरोपी राहुल पहाड्या पावरा (वय २३),अक्तारसिंग शिवदास पावरा (वय २४),रविंद्र पंडीत पावरा (वय २०),पहाडसिंग कुमार पावरा (वय २४),
सर्व राहिवासी महादेव दोडंवाड, ता. शिरपूर, जि. धुळे यांना अटक करत यांच्याविरुद्ध NDPS ACT १९८५ अंतर्गत कलम२९, २०(B),८(C) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा गुन्ह्याचा तपास पोउनि योगेश माळी करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता गेरकर (पवार), उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात सपोनि भरत चौधरी, पोहेकॉ. गुपेश वंजारी, नितीन वाल्हे, विनोद पाटील,पो कॉ पवन पाटील, निलेश पाटील, प्रविण पवार, प्रथमेश पाटील, दिपक चौधरी, विजय महाजन तसेच गुन्हे शोध पथकाचे अंमलदार सहभागी होते.
