अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- दि. १६ जुलै २०२५ शहरात बेकायदेशीररीत्या गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर चाळीसगाव शहर पोलिसांनी पहाटेच्या सत्रात धडक कारवाई करत सुमारे १५ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, नागद गावाकडून गुटख्याने भरलेली महिंद्रा कंपनीची बुलेरो मालवाहू गाडी (क्र. MH-41-AU-3210) चाळीसगाव शहरात येत आहे. सदर माहितीच्या आधारे पो.उ.नि. संदीप घुले, पोलीस अंमलदार आशुतोष सोनवणे, रविंद्र बच्छे, समाधान पाटील यांनी तात्काळ पथक तयार करत हीरापुर रोडवरील नवजीवन सुपर शॉपी समोर संशयित वाहन अडवले.
तपासणीदरम्यान वाहनाच्या मागील बाजूस गुटख्याने भरलेल्या गोण्या आढळून आल्या. तत्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून पंचनामा करण्यात आला. त्यानुसार गाडीतील गुटख्याची किंमत ₹७,१९,०२९/-, तर वाहनाची किंमत ₹८,००,०००/- असल्याचे निष्पन्न झाले. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹१५,२९,०२९/- इतकी आहे.
या प्रकरणी वाहनचालक अरबाज इब्राहीम पठाण (रा. सार्वे, ता. पाचोरा) आणि गुटखा मालक दिपक वेदमुथा (रा. नागद, जि. संभाजीनगर) यांच्याविरोधात शरद मधुकर पगार (सुरक्षा अधिकारी, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं. ३०६/२०२५ नुसार भा.न्या.सं. (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५,अन्न सुरक्षा कायदा २००६ कलम २६ (२)(आय)(१),२७ (१),(३)(D)(E) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (पवार), उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली पो.उ.नि. संदीप घुले, अंमलदार राहुल सोनवणे, योगेश बेलदार, आशुतोष सोनवणे, रविंद्र बच्छे, समाधान पाटील तसेच गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.
पुढील तपास पो.उ.नि. संदीप घुले व हे कॉ राकेश पाटील करत आहे.
