अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील कोदगाव बायपास वर आज एक भीषण अपघात घडला. मोटारसायकल (क्र. एमएच 20 सीएक्स 2051) आणि पिकअप वाहन (क्र. एमएच 20 जीझेड 1844) यांच्यात आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास समोरासमोर धडक होऊन मोटारसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघात इतका जबरदस्त होता की अपघातात पिकअप रस्त्यावर उलटली व मोटार सायकल ला जोरदार धडक लागल्याने मोटारसायकलवरील सुदाम लक्ष्मण पवार 52 रा. खरजई चाळीसगाव तालुका,श्रावण किरण माळी 55 रा जातेगाव नांदगाव तालुका दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून अपघाताची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.पिकअप चालकाला शहर पोलिस प्रशासनाने ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा
तहसील कार्यालयात ईव्हीएम प्राथमिक तपासणी पूर्ण तर जिल्हा परिषद प्रभाग रचना संदर्भात ४४ हरकती प्राप्त
अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार अजय मालचे, कॉ नंदू महाजन आणि कॉ दत्ता पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील कार्यवाही सुरू असून पुढील तपास शहर पोलिस करत आहेत.
या अपघातामुळे कोदगाव बायपास मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
