अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आज, दिनांक २२ जुलै रोजी भारतीय जनता पार्टी, चाळीसगाव शहर मंडळ यांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकात, आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 10 वाजे पासून भाजपा कार्यालयाजवळील मैदानात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा
भीषण अपघातात दोघांचा मृत्यू : कोदगाव बायपासवर मोटारसायकल व पिकअपची धडक
या उपक्रमात शहर व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शिबिरात महिलांसह पुरुषांनी देखील मोठ्या संख्येने रक्तदान केले. शंभराच्या जवळपास रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
कार्यक्रमास भाजपा शहर मंडल अध्यक्ष नितीन पाटील, सायगाव मंडल अध्यक्ष दिनेश महाजन, वाघळी मंडल अध्यक्ष डॉ. महेंद्र राठोड, मेहुणबारे मंडल अध्यक्ष प्रदीप देवरे,योगेश गव्हाणे,फकिरा मिर्जा,योगेश खंडेलवाल,विशाल कारडा, चिराग मेंबर आदी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमामुळे वाढदिवसाचा आनंद रक्तदानाच्या माध्यमातून लोकसेवेत रूपांतरित झाला.
